अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व अद्वितीय डान्स सेन्सेशन असलेल्या सपना चौधरी यांनी वर्षानुवर्षे मनोरंजन क्षेत्रामध्ये छाप पाडली आहे. एण्ड टीव्हीवरील मालिका 'मौका-ए-वारदात'सह पदार्पण केलेली ही हरियाण्वी सेन्सेशन मालिका आणि तिच्या भूमिकेबाबत सविस्तरपणे सांगत आहे.
१. तुम्ही 'मौका-ए-वारदात'सह टेलिव्हिजन मालिकेमध्ये पदार्पण केले? तुम्हाला या मालिकेला होकार देण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले?
प्रत्येक कलाकार नेहमीच वरचढ ठरणा-या व छाप पाडणा-या उल्लेखनीय प्रकल्पांचा शोध घेत असतो. मी माझ्या करिअरच्या बाबतीत योग्य निर्णय घेताना अत्यंत जबाबदार राहिले आहे. एण्ड टीव्हीवरील 'मौका-ए-वारदात' मालिकेला मी नकार देऊच शकली नाही. मी मालिकेची संकल्पना व स्वरूपाबाबत ऐकले तेव्हा निर्मात्यांनी काही सर्वात अकल्पनीय गुन्हे ज्या पद्धतीने सादर केले त्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. प्रेक्षकांना सर्वात अकल्पनीय व थरारक गुन्हेगारी कथांमध्ये विश्वास ठेवण्यास भाग पाडणे ही मोठी जबाबदारी होती, म्हणूनच मी हे आव्हान स्वीकारण्याला होकार दिला.
२. आम्हाला तुमच्या भूमिकेबाबत सांगा. तुम्हाला 'मौका-ए-वारदात'बाबत आवडलेली बाब कोणती?
आपण मला सूत्रधार म्हणू शकता. आपण पाहिलेच असेल की मी काही विलक्षण गुन्हेगारी कथांची माहिती सांगताना दिसत आहे. महिलांना आजही कमकुवत समजले जाण्यासोबत चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यापासून दूर ठेवले जात असताना गुन्हे व गुन्हेगारांबाबत माहिती देणा-या एका प्रबळ महिलेची भूमिका साकारण्याचा मला अभिमान वाटतो. मी आशा करते की, यामुळे लोकांच्या रूढीवादी विचारसरणीमध्ये बदल होण्यास मदत होईल. तसेच 'मौका-ए-वारदात'च्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रमुख महिला पात्र रहस्याचा उलगडा करण्यामध्ये, या असाधारण गुन्ह्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करते, ज्यामुळे महिला पात्र अधिकच महत्त्वपूर्ण ठरते.
३. ही मालिका गुन्हेगारी थ्रिलरमधील तुमच्या पदार्पणाला सादर करते. ही शैली तुमच्यासाठी नवीन असल्यामुळे तुम्ही यासाठी काही तयारी केली का?
तयारीच्या बाबतीत आरसा माझा जिवलग सोबती आहे. मी अनेकदा आरशासमोर उभी राहून संवाद सादर करण्याचा आणि त्यानुसार हावभाव व्यक्त करण्याचा सराव करते. म्हणून या मालिकेसाठी माझी शैली व हावभाव परिपूर्ण असण्याकरिता मी हीच गोष्ट केली. याव्यतिरिक्त मी प्रेक्षकांशी संलग्न होण्यासाठी माझ्या आवाजातील चढ-उतार कौशल्यांवर देखील लक्ष केंद्रित केले.
४. तुमच्यासोबत घडलेला गुन्हा किंवा दुर्दैवी घटनेचा एखादा वैयक्तिक अनुभव (सध्याचा किंवा भूतकाळातील), ज्यामुळे तुम्ही एक नागरिक म्हणून अधिक दक्ष व सावध झालात?
माझ्या बाबतीत आतापर्यंत गंभीर गुन्हा घडलेला नाही, पण एक घटना मला आजही आठवते. या घटनेमुळे मी जागरूक झाले आणि मला समजले की, कोणताही गुन्हा ओळखण्यामध्ये हेतू महत्त्वाची भूमिका बजावतात. माझ्या शेजारी एक साधेभोळे कुटुंब राहत होते आणि त्यांच्याबाबत काही चुकीचे असेल असे देखील वाटत नव्हते. पण एकेदिवशी समजले की, वृद्ध जोडप्याला अनेक वर्षांपासून त्यांच्या सूनेकडून शाब्दिक गैरवर्तनाचा सामना करावा लागत आहे. हे समजल्यानंतर धक्काच बसला. या धक्कादायक घटनेमुळे माझ्या विश्वासाला इतका तडा बसला की मी माझ्या सभोवती असणा-या प्रत्येक लोकांबाबत दक्ष राहू लागले.
५. गुन्हेगारी शैलीने नेहमीच सर्व वयोगटातील महिलांना आकर्षून घेतले आहे. तुमच्या मते, यामागील कारण काय असेल?
पुढे काय घडणार याबाबतची रोमांचकता व उत्कंठा सर्व प्रेक्षकांसाठी संबंधित राहणार आहे. माझ्या मते, गृहिणी असलेल्या सर्व महिलांसाठी गुन्हेगारीसंदर्भातील मालिका सर्वात मनोरंजनपूर्ण आहेत. या मालिकांमुळे त्यांना सुरक्षितता जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे देखील समजण्यामध्ये मदत होते.
६. तुम्ही तुमच्या मातृत्वाची जबाबदारी कशाप्रकारे पार पाडत आहात?
माझा आनंद गगनात मावेनासा आहे आणि मालिकेमध्ये काम करण्याचा संपूर्ण अनुभव उत्तमच राहिला आहे. माझ्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. मी दिवसभर अधिककरून कामामध्येच व्यस्त असले तरी मी पुरेसा वेळ काढून माझा मुलाला प्रेम देण्यासोबत त्याच्याकडे लक्ष देण्याची काळजी घेते. तसेच, माझे पती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य माझ्यासाठी हा प्रवास सुलभ करण्यामध्ये सहाय्यक राहिले आहेत, म्हणून मी त्यांचे आभार मानते.
७. प्रेक्षक/ वाचकांसाठी तुमचा संदेश?
सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण नकळतपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण नेहमी दक्ष असणे गरजेचे आहे, कारण गुन्हा चेहरा किंवा चेतावनीसह होत नाही. मालिका 'मौका-ए-वारदात' प्रेक्षकांना दररोज आसपासच्या परिसरामध्ये होत असलेल्या धक्कादायक व अकल्पनीय गुन्ह्यांबाबत जाणीव करून देण्याच्या उद्देशासह सादर करण्यात आली. मी सतत आमच्यावर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करत असलेले आमचे सर्व चाहते व प्रेक्षकांचे आभार मानते.
पहा सपना चौधरीला 'मौका-ए-वारदात'मध्ये दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment