Thursday, 8 April 2021

&TV || जेव्‍हा हे तीन मित्र एकत्र येतात, तेव्‍हा भाबीजीच्‍या सेटवर असते धमाल

नवीन एंट्री नेहमीच प्रेक्षकांसाठी, तसेच कलाकारांसाठी उत्‍साहाची भावना निर्माण करतो. आणि कोणी मोहक चेह-याने प्रवेश केला तर काही सांगायलाच नको! असेच काहीतरी मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये भारतीय टेलिव्हिजनचे लोकप्रिय बाबुजी अनंग देसाई यांनी एंट्री करताच मालिकेमधील आसिफ शेख – विभुती नारायण मिश्रा आणि रोहिताश्‍व गौड – तिवारीजी यांच्‍या बाबतीत घडले. अनिता भाभीचे वडिल डॅनी शर्माची भूमिका साकारणारे अनंग देसाई यांच्‍या एंट्रीसह मालिकेमध्‍ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि मॉडर्न कॉलनीचे प्रमुख पुरूष व त्‍यांच्‍यामध्‍ये पडद्यामागे देखील अनोखा ब्रोमांस दिसून येत आहे. हे अद्भुत त्रिकूट पडद्यामागे अनेक विनोद व गप्‍पागोष्‍टी करताना दिसते. त्‍यांच्‍यामध्‍ये इतके दृढ साहचर्य निर्माण झाले आहे की कधी-कधी मालिकेमधील प्रमुख अभिनेत्रींना वेगळे असल्‍यासारखे वाटते. अनंग देसाई यांच्‍यासोबतच्या या अनोख्‍या नात्‍याबाबत सांगताना आसिफ शेख म्‍हणाले, ''मी अनंगजी यांचा खूपच आदर करतो. मला त्‍यांच्‍यासोबत पुन्‍हा एकदा काम करण्‍याचा आनंद होत आहे. त्‍यांच्‍यामध्‍ये खूप सकारात्‍मकता आहे आणि आम्‍ही एकमेकांसोबत असताना नेहमीच आनंददायी असतो. आमचे पडद्यामागील नाते मालिकेमध्‍ये देखील दिसून येते आणि हेच साहचर्य मालिकेमधील आमची सासरा-जावईची जोडी चाहते व प्रेक्षकांमध्‍ये हिट करेल.'' आपला आनंद व्‍यक्‍त करत रोहिताश्‍व गौड म्‍हणाले, ''आम्‍हाला भाबीजीच्‍या सेटवर अनंगजी असण्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍यामधील केमिस्‍ट्री रंगभूमीच्‍या दिवसांपासून आहे आणि त्‍यांच्‍यासोबत पुन्‍हा एकदा काम करण्‍याचा खूपच आनंद झाला आहे. ते सोबत काम करण्‍यासाठी एक धमाल व्‍यक्‍ती आहेत, तसेच पडद्यामागे देखील ते अत्यंत उत्‍साही असतात. त्‍यांच्‍या प्रवेशासह आम्‍हाला पहिल्‍यांदाच भाभींना असुरक्षित वाटल्‍यासारखे दिसले.'' याबाबत बोलताना अनंग देसाई म्‍हणाले, ''मला नेहमीच तरूण पिढीसोबत काम करताना आनंद येतो. भाबीजीच्‍या सेटवर मला उत्‍साही व प्रेमळ भावना मिळाली. रोहिताश्‍व व आसिफ मला खूप जवळचे आहेत. मी त्‍यांच्‍यासोबत यापूर्वी काम केले आहे. अशा लोकप्रिय मालिकेमध्‍ये पुन्‍हा त्‍यांच्‍याशी संलग्‍न होणे ही आनंददायी बाब आहे. आम्‍ही पडद्यामागे खूप धमाल करतो आणि हीच धमाल आमच्‍या मालिकेमधील अभिनयामधून दिसून येते.''

या विनोदी त्रिकूटाला पाहण्‍यासाठी पाहत राहा 'भाबीजी घर पर है' दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

No comments:

Post a Comment