मुंबई ८ एप्रिल, २०२१ : ज्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा... यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या ज्यामध्ये आपल्याला एक से बडकर गाणी ऐकायला मिळाली आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाल्या १६ गायिका...या १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द आणि महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्राची एक नवी “आशा उद्याची... येत्या रविवारी म्हणजेच ११ एप्रिल रोजी संध्या ७.०० वा. नक्की बघा सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere आपल्या लाडक्या वाहिनीवर कलर्स मराठीवर !
कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे पण तोच आनंद द्विगुणीत होणार आहे कारण, अवधूत गुप्ते यांचा धमाकेदार परफॉर्मन्स देखील असणार आहे... अवधूत गुप्ते यांनी नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच सोबत आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या गोड आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सावनी रविंद्रला 67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला असून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर तिचा सत्कार करण्यात आला...
येत्या रविवारी म्हणजेच ११ एप्रिल रोजी संध्या ७.०० वा. नक्की बघा सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere आपल्या कलर्स मराठीवर !
No comments:
Post a Comment