Wednesday, 7 April 2021

&TV I World Health Day note | जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार म्‍हणाले, 'जान है तो जहाँ है'

सध्‍या सुरू असलेल्‍या साथीच्‍या रोगादरम्‍यान बैठेकाम करण्‍याची जीवनशैली न्‍यू नॉर्मल बनली आहे. कोविड-१९ साथीच्‍या रोगाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे जीवनशैलीप्रती नवीन व आरोग्‍यदायी दृष्टिकोनाचा अवलंब करणे आणि मागील वर्षभरापासून सोशल मीडियावर अधिक चर्चेत राहिलेल्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे बनले आहे. आरोग्‍यदायी आणि उत्तम जीवनामध्‍ये अडथळा निर्माण करणा-या समस्‍यांवर मात करण्‍यासाठी एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार – मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील रमेश प्रसाद मिश्रा (अंबरिश बॉबी), शांती मिश्रा (फरहाना फातेमा), जफर अली मिर्झा (पवन सिंग) व सकिना मिर्झा (आकांक्षा शर्मा), मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील राजेश सिंग (कामना पाठक) आणि मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मधील संतोषी माँ (ग्रेसी सिंग) यांनी यंदाच्‍या जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यासाठी त्‍यांच्‍या सूचना व ट्रिक्‍सबाबत सांगितले. अंबरिश बॉबी ऊर्फ रमेश प्रसाद मिश्रा म्‍हणाले, ''माझा शरीरयष्‍टीच सुदृढ ठेवण्‍यावर विश्‍वास नाही, तर आरोग्‍यदायी भविष्‍य निर्माण करण्‍याला पाठिंबा आहे. यंदा जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त मी सर्वांना उत्तम जीवनशैली व आरोग्‍यदायी भविष्‍य असण्‍याप्रती पुढाकार घेण्‍याचे आवाहन करतो. आपल्‍या आरामदायी बाबींना बाजूला ठेवत सकाळी लवकर उठा आणि व्‍यायाम करा.'' फरहाना फातेमा ऊर्फ शांती मिश्रा म्‍हणाल्‍या, ''हे खरे आहे की, महामारीच्‍या प्रादुर्भावाच्‍या चिंतेमुळे आपण आपल्‍या स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष केले आहे. तंदुरूस्‍त व आरोग्‍यदायी राहण्‍याचा माझा मार्ग म्‍हणजे नृत्‍याप्रती माझी आवड. नृत्‍यासोबतच होऊन जातो व्‍यायाम!'' आरोग्‍याच्‍या बाबतीत कोणतीच तडजोड करू नये.'' पवन सिंग ऊर्फ जफर अली मिर्झा म्‍हणाले, ''माझ्या आरोग्‍याचा फक्‍त माझ्यावरच नाही, तर माझ्या कुटुंबावर देखील परिणाम होतो. मी स्वस्थ नसलो तर त्‍याचा परिणाम त्‍यांच्‍यावर देखील दिसून येतो. माझी पत्‍नी मी सेवन करत असलेल्‍या कॅलरीच्‍या प्रमाणावर लक्ष ठेवते आणि मी दररोज व्‍यायाम करण्‍याची खात्री घेते. यंदा जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त फिटनेससंदर्भात प्रतिज्ञा करा आणि धमाल व फिटनेसने परिपूर्ण दिवसाचा आनंद घेणे टाळू नका.'' आकांक्षा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्‍हणाल्‍या, ''कोविडपूर्वी माझ्या मैत्रिणी आणि मी आठवड्यातून दोनदा भेटायचो आणि बॉलिवुड गाण्‍यांवर थिरकायचो. मैत्रिणींसोबत वेळ व्‍यतित करण्‍याचा आणि आरोग्‍याकडे लक्ष देण्‍याचा तो उत्तम मार्ग होता. मित्रमैत्रिणी मानसिक आरोग्‍य उत्तम राहण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्‍ही ही सुंदर परंपरा कायम ठेवण्‍यासाठी लवकरच झूम डान्‍स पार्टीजचा अवलंब केला.'' कामना पाठक ऊर्फ राजेश सिंग म्‍हणाल्‍या, ''शरीर तंदुरूस्‍त असणे याची सुरूवात शरीराच्‍या आतूनच होते. आरोग्‍यदायी आहाराचे सेवन नित्‍याने करत असाल तर कधीतरी खासप्रसंगी वेगळ्या भोजनाचा आस्‍वाद ठीक आहे. जीवन हे समस्या व आजारांबाबत चिंता करत व्‍यतित करण्‍यासाठी खूपच लहान आहे. आपण सामना करत असलेल्‍या महामारीचा आपल्‍या शरीरावर परिणाम झाला असताना पोषण व प्रेमासह स्‍वत:ची काळजी घ्‍या.'' ग्रेसी सिंग ऊर्फ संतोषी माँ म्‍हणाल्‍या, ''जागतिक आरोग्‍य दिन आपणा सर्वांना आपल्‍या आरोग्‍याबाबत काळजी घेण्‍याची आठवण करून देतो. माझ्याबाबतीत मेडिटेशन व योगा मला शारीरिकदृष्‍ट्या व मानसिकदृष्‍ट्या तंदुरूस्‍त ठेवतात. दररोज एक तासाचे मेडिटेशन मला कोणत्‍याही स्‍पापेक्षा अधिक शांतमय अनुभव देते.''

No comments:

Post a Comment