Monday 12 April 2021

Zee Talkies - Gudhi Padwa Film Festival

 हा गुढीपाडवा साजरा करा झी टॉकीज गुढीपाडवा फिल्म फेस्टिवल सोबत  

फार पूर्वी पासून चित्रपट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. चित्रपट बहुधा मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेले असतात. यातील काही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत. ज्यांची मांडणी, थिम थोड्या अनोख्या पद्धतीने आखलेल्या आहेत. मराठी नववर्षाची सुरुवात अशाच काही चित्रपटांसोबत झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांसोबत करणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काही खास चित्रपट सादर करणार आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षक झी टॉकीजवर सदाबहार चित्रपटांची मेजवानी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनुभवू शकतात. सकाळी ९ वाजता मकरंद अनासपुरे याचा सुपरहिट चित्रपट 'दे धक्का' प्रसारित होईल. त्यानंतर ११ वाजता देऊळ बंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दुपारी १.३० वाजता सायली संजीव हिचा बस्ता तर ४ वाजता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या धमाल जोडीचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रसारित होईल आणि रात्री श्रीखंड पुरीच्या बेतासोबत रात्री १० वाजता मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकतात.
तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात झी टॉकीजवर काही धमाकेदार चित्रपटांसोबत करण्यासाठी सकाळी ९ वर्ज्यापासून पाहायला विसरू नका 'गुढीपाडवा फिल्म फेस्टीवर' फक्त आपल्या झी टॉकीजवर          

No comments:

Post a Comment